आमदार परिचारकांचा निषेध

By Admin | Updated: February 25, 2017 00:02 IST2017-02-25T00:01:47+5:302017-02-25T00:02:02+5:30

कळवण : माजी सैनिकांची निदर्शने

Protest of MLA attendants | आमदार परिचारकांचा निषेध

आमदार परिचारकांचा निषेध

कळवण : पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबाबत अशोभनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कळवण येथील माजी सैनिकांनी निषेध व्यक्त करत परिचारकांवर कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या परिवाराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यामुळे सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परिचारक यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  शुक्रवारी सकाळी कळवण येथे बसस्थानकाजवळ माजी सैनिकांच्या संघटनेने परिचारकांच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. सैनिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी परिचारक यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांना दिले.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष शांताराम पवार, उपाध्यक्ष प्रभाकर पगार, महादू पगार, कडू पगार, संघटक शरद पवार, उपाध्यक्ष बाबूभाई शेख, रशीद शेख, रमेश हिरे, डी. राजगिरे, सचिव मोठाभाऊ वळींकर, रघुनाथ पगार, हिरामण देवरे, शिवाजी शिंदे, सावळीराम बागुल, प्रल्हाद पवार, केदा पगार, दत्तू मोरे, गोविंद पगार, सुकदेव पगार, लक्ष्मण बिरारी, भिला बच्छाव, नारायण अहेर, सोनू पगार, गोपीनाथ जगताप, यमाजी पवार, शरद कदम, बापू पगार, जिभाऊ जाधव, प्रदीप पगार, चेतन पगार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Protest of MLA attendants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.