नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)विविध संघटनांंसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.मातोरीतील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपींना अधिकाधिक कठोर शिक्षा करून समाजातील दुर्बल, दलित व वंचित घटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी यासह ग्रामीण भागातील फार्महाउसवर अवैधरीत्या चालू असणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा उभी करून फार्महाउसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करावे, अत्याचार पीडित तरुणांना समाजकल्याण विभागामार्फत आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने शासनाकडे शिफारस करावी आदी मागण्याही नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चातून केली.हमको चाहीये गुंडागिरीसे आझादी, गुंडगिरी थांबली पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत गोल्फ क्लब येथून निघालेला हा मोर्चा त्र्यंबकनाका, अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नलमार्गे शालिमारवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर मोर्चातील प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मानवतेला काळिमा फासणाºया मातोरी येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले.
मातोरी येथील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:01 IST
नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)विविध संघटनांंसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी ...
मातोरी येथील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
ठळक मुद्देकठोर शिक्षेची मागणी। सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग