शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

‘त्या’ क्रूर अमानवी कृत्याचा ४८ चौ.फूटाच्या रांगोळीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:37 IST

हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला

ठळक मुद्दे६ फूट रूंद व ८फूट लांबीची रांगोळी सहा तास अविरत परिश्रम

नाशिक : केरळमधील एका गर्भवती हत्तीणीला काही क्रूर मानवांनी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला अन् तीने एक दोन नव्हे तर चार दिवस मरणयातना पाण्याच्या तलावात उभे राहून भोगल्या अन् अखेर मृत्यूला कवटाळले. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने अवघा देश थरथरला. सोशलमिडियावर नेते, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. अशाच पध्दतीने नाशिकची युवा रांगोळीकार पुजा बेलोकर व तिच्या सहकाऱ्यांनी सहा तास अविरत परिश्रम घेत ६ फूट रूंद व ८फूट लांबीची रांगोळी रेखाटून अमानवी कृत्याचा निषेध नोंदविला.नाशिकमधील रविवार कारंजा येथील लोणार गल्लीत पुजा, ओमकार टिळे यांनी या क्रूर घटनेकडे आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. ४८ चौरस फूटाची रांगोळी काढण्यासाठी पुजा आणि ओमकारला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शिर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे.केरळमध्ये हत्तीणीचा अशा पध्दतीने ‘खून’ करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आली आणि अवघा देश हादरला. सोशलमिडिया गहिवरून आला. सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. सर्वांनी या क्रूरतेला माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य म्हटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरांमधून पुढे आली. केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकKeralaकेरळwildlifeवन्यजीव