सुरक्षारक्षकांनीच केली चोरी
By Admin | Updated: May 27, 2014 01:37 IST2014-05-26T23:55:08+5:302014-05-27T01:37:11+5:30
नाशिक : सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस ठेवलेल्या दोघांनी कंपनी आवारात ठेवलेले जुने मटेरियल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरमधील प्रिसिजन इंडस्ट्रिज या कंपनीत गणेश जाधव आणि आनंदी सिंग या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती़ या दोघांनी २३ ते २५ मे या कालावधीत कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या ८० हजार रुपये किमतीच्या लोखंडी कॉईल चोरून नेल्याची फि र्याद महेंद्र धनश्याम भालेराव (४२, रा़ नाशिक-पुणे रोड, शिवाजीनगर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी जाधव आणि सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)