नाशिक : येथील जनसेवा बहुउद्देशीय सेवा संघाच्यावतीने नेपाळी समाजातील दहावी,बारावी, पदवीधर,पदव्युत्तर तसेच क्र ीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनिय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे उपस्थित होते.कार्यक्र माला जनसेवा बहुउद्देशीयचे अध्यक्ष कृष्णबहादुर पुन, उपाध्यक्ष नंदकुमार ददेल, सचिव डॉ. जनककुमार भंडारी, सहसचिव शाम सोनार, कोषाध्यक्ष शंकर राजपूत, संचालिका सौ.रत्ना ददेल, संचालक करण शिरपायली,विक्र म हितांगे, सतिष बोरा, मागदर्शिका सौ.विद्या भंडारी, संयोजक एकनाथ(पप्पू)ददेल, साईयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदा थापा, संस्थेचे सभासद व देणगीदार उपस्थित होते.
जनसेवा संघातर्फे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:03 IST
नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांचा सत्कार
जनसेवा संघातर्फे गुणवंतांचा गौरव
ठळक मुद्देविशेष उल्लेखनिय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले