भ्रष्ट अधिकाऱ्यांवर समृद्धी महामार्गाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST2017-07-18T00:30:26+5:302017-07-18T00:32:19+5:30

शेतकरी संघर्ष समिती : बबन हरणे, सतीश मांगले यांनी केले आरोप

Prosperity highway axle on corrupt officials | भ्रष्ट अधिकाऱ्यांवर समृद्धी महामार्गाची धुरा

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर समृद्धी महामार्गाची धुरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : समृद्धी महामार्ग कार्पोरेशनचे सर्वेसर्वा असलेले राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते बबन हरणे यांनी केला आहे. मोपलवार आणि त्यांचे अधिकारी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची धुरा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सोपविली असल्याचा आरोपही हरणे व सतीश मांगले यांनी केला आहे.
नाशिकमधील सिडकोतील मानव सेवा केंद्रात समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या निर्धार बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत हरणे व मांगले यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी असलेल्या राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले.
तसेच मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहितीही जाहीर केली. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही मोपलवार यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोपही मांगले व हरणे यांनी केला असून, या सरकारच्या काळात सर्वसामान्यांना नव्हे, तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सरकारला खोटी माहिती दिल्याचा आरोपसमृद्धीच्या भूसंपादनासाठी मोपलवार सरकारला वस्तुनिष्ठ माहिती पुरवत नाहीत. शंभर टक्के शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याची खोटी माहिती मोपलवार सरकारला देत आहेत. भ्रष्टाचारात बुडालेल्या मोपलवारांकडून
शेतक ऱ्यांनी काय अपेक्षा करावी, असा सवालही हरणे यांनी उपस्थित केला.

Web Title: Prosperity highway axle on corrupt officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.