फाळके स्मारकाजवळ वेश्याव्यवसाय : पोलिसांचा छापा
By Admin | Updated: March 27, 2017 19:05 IST2017-03-27T19:05:23+5:302017-03-27T19:05:23+5:30
फाळके स्मारकाशेजारील एका रो- हाउसमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी (दि़२५) रात्री छापा टाकला़

फाळके स्मारकाजवळ वेश्याव्यवसाय : पोलिसांचा छापा
नाशिक : फाळके स्मारकाशेजारील एका रो- हाउसमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी (दि़२५) रात्री छापा टाकला़ या ठिकाणी मुंबई व आसाम येथील महिलांकडून राणेनगरमधील वेश्याव्यवसायचालक बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होता़ याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह सात संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे़ या संशयितांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (दि़२८) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
इंदिरानगर पोलिसांना फाळके स्मारकाजवळील क्लासिक हाउसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित अजय भालचंद्र वाणी (३५, रा़ फ्लॅट नंबर ९, साईदर्शन अपार्टमेंट, भगवती गॅसच्या मागे, राणेनगर, नाशिक) हा मुंबई व आसाम येथील महिलांकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होता़