मारामारीच्या गुन्ह्यात आरोपीस सश्रम कारावास

By Admin | Updated: July 14, 2014 00:32 IST2014-07-13T23:12:09+5:302014-07-14T00:32:38+5:30

मारामारीच्या गुन्ह्यात आरोपीस सश्रम कारावास

Prosecution rigorous imprisonment in the war | मारामारीच्या गुन्ह्यात आरोपीस सश्रम कारावास

मारामारीच्या गुन्ह्यात आरोपीस सश्रम कारावास

नांदगाव : येथील आनंदनगरात राहणाऱ्या श्रीमती मीना गुलाब घुसळे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपी योगेश खंडू बागुल यांस नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी तीन महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर मारहाणीची घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. आरोपी योगेश बागुल हा फिर्यादी मीना घुसळे यांच्या मुलीला येता-जाता खडे मारत असे म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १० जून २००९ रोजी रात्री १० च्या सुमारास योगेशने मीना घुसळे यांना रस्त्यात अडवून माझ्या विरुद्ध पोलिसांकडे फिर्याद का दिली, असे विचारत योगेशने मीना यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.
याबाबत नांदगाव पोलिसांनी योग्य चौकशी करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. तेथे सर्व साक्षीदारांचे म्हणणे ऐकून न्या. नरवडे यांनी आरोपी योगेश बागुल याला दोषी ठरवून तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार के. पी. जगताप, भोयर यांनी केला. सरकारी वकील डी. आर. जयकर यांनी काम पाहिले.

Web Title: Prosecution rigorous imprisonment in the war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.