तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा ठरावं
By Admin | Updated: July 27, 2014 01:53 IST2014-07-27T00:55:40+5:302014-07-27T01:53:00+5:30
तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा ठरावं

तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा ठरावं
नाशिक : नवीन तंत्रज्ञान व कुशल कामगार उपलब्धतेसाठी कुशल तंत्रज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती करणे यासह बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्याबाबतचे विविध ठराव बिल्डर असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आले़ दोनदिवसीय परिषदेचा आज समारोप झाला़
हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही परिषद सुरू होती़ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन परिषदेस प्रारंभ झाला होता़ अखिल भारतीय बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सुशांतकुमार बासू यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या चर्चासत्रात बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा झाली़ यामध्ये सीमेंटच्या दरातील वाढ, अडचणीत आणणारे जुने कायदे, नवीन तंत्रज्ञानाचा अभाव, कामगारांचे प्रश्न, शासकीय कार्यालयीन अडवणूक यावर चर्चा केली़ चर्चेनंतर अखेरीस बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रमुख सहा ठराव करून त्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले़
याप्रसंगी असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, लालचंद शर्मा, सचिव सी़ डी़ देवचक्के, राज्याचे अध्यक्ष नीळकंठ जोशी, राजू जॉन, जिल्ह्याचे अध्यक्ष विलास बिरारी, रामेश्वर मालाणी, मोहन कटारिया, गोपाल अटल, भूपेंद्र लाल, मदन जगोटा, राजेंद्र मुथा, राहुल सूर्यवंशी, जी़ जी़ काटकर, जितू शाह, जनक मेहता, अविनाश आव्हाड, राजेंद्र धोंडगे, संदीप दरगोडे, विलास निफ ाडे, सुधाकर मुळाणे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)