शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

प्रपोज डे लाच प्रियकराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 11:34 PM

नाशिक :  व्हॅलेंटाइन वीक एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात प्रपोज डे लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देलग्नास नकार मिळाल्याने टोकाचे पाऊल : इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीतील धक्कादायक घटना

नाशिक :  व्हॅलेंटाइन वीक एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात प्रपोज डे लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) या युवकाने त्याचे प्रेम प्रेयसीकडे व्यक्त करत लग्नाची मागणी घातली; मात्र तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून अजय याने आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी किरण श्रावण गिरी याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद प्रथमदर्शनी केली आहे.अजय याचा रूम पार्टनर किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना अजय याने तो येण्यापूर्वीच पंख्याला दोरी बांधून त्याअधारे गळफास घेत आपले जीवन संपविले. जेव्हा किरण हा दुपारी घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी इमारतीमधील अन्य रहिवाशांनीही धाव घेत दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र दरवाजा उघडत नसल्याने रहिवाशांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळेतच बिट मार्शल तेथे दाखल झाले व त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावले असता अजयने गळफास घेतल्याचे लक्षात आले. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत अजयला तिच्या मैत्रिणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत. गुन्हा दाखल केला आहे.अजय होता इंजिनिअरअजय याने बॅचलर ऑफ टेक्नॉलोजीची पदवी घेतली असून, तो नाशिक येथील एका आरओ उपकरण विक्री करणाऱ्या कंपनीत नोकरी करत होता. मागील चार महिन्यांपासून अजय हा राजसारथी सोसायटीत त्याचा मित्र किरणसोबत भाडेतत्त्वावर राहत होता. तो मूळ अहमदनगरमधील पाथर्डी येथील होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहेत. अजयने टोकाचे पाऊल उचलून स्वत:चे जीवन संपविल्याने थोरात कुटुंबीयांसह त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, दाजी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात अहमदनगरच्या पाथर्डी या मूळ गावी त्याचा अंत्यविधी पार पडला.