शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिक शहरातील आठवडे बाजारांच्या जागांचा अन्य दिवशी वापराचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 18:44 IST

शहर सुधार समिती : उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना

ठळक मुद्देजागा लिलाव पद्धतीने देऊन त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते रस्त्यांवर बसणाऱ्या  भाजीविक्रेत्यांना उर्वरित दिवशी आठवडे बाजारच्या जागांवर स्थलांतरीत करण्याची सूचना

नाशिक - शहरात गंगेवरील बाजारासह ज्याठिकाणी आठवडे बाजार भरतात, त्याच्या इतर दिवशीही सदर जागांचा वापर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधार समितीच्या बैठकीत चर्चिला गेला. सदर जागा लिलाव पद्धतीने देऊन त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे पुढील सभेला सविस्तर माहिती ठेवण्याचे आदेश सभापती भगवान दोंदे यांनी दिले.शहर सुधार समितीच्या बैठकीत, सत्यभामा गाडेकर यांनी आठवडे बाजारपेठांसाठी असलेल्या जागा उर्वरित दिवसांसाठीही वापरण्यास देण्यासाठी धोरणात्मक निर्णयाकरीता प्रस्ताव मांडला. यावेळी गाडेकर यांनी सदर जागांच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकणार असल्याचे सांगितले. पंडित आवारे यांनी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर बसणाऱ्या  भाजीविक्रेत्यांना उर्वरित दिवशी आठवडे बाजारच्या जागांवर स्थलांतरीत करण्याची सूचना केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. स्वाती भामरे यांनी महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था गंभीर असल्याचे सांगत त्याची सविस्तर माहिती मागविली. सार्वजनिक शौचालयांची साफसफाईच होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तर आवारे यांनी ज्याठिकाणी उत्पन्न मिळते, तेथेच सुलभचे लोक लक्ष घालत असल्याची तक्रार केली. गाडेकर यांनी केअर टेकर म्हणून महिला बचत गटांना काम देण्याची सूचना केली. गाडेकर यांनी, शहरातील सार्वजनिक शौचालये, महापालिका शाळा, रुग्णालये यांच्या इमारतींच्या भिंतींवर आरोग्यविषयक संदेश लिहिण्याची सूचना केली. परंतु, बांधकाम विभागाने सदर काम हे आरोग्य विभागाचे असल्याचे सांगताच गाडेकर यांनी या टोलवाटोलवीबद्दल अधिकाºयांना धारेवर धरले. रस्त्यांवरील पादचारी मार्ग आणि दुभाजकांच्या स्वच्छतेबाबतचा प्रस्ताव सतिश कुलकर्णी यांनी समितीला दिला होता. त्यानुसार, सभापतींनी स्वच्छतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केले. स्वाती भामरे यांनी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये बोगनवेल न लावण्याची सूचना केली. यावेळी प्रभारी उद्यान अधिक्षक महेश तिवारी यांनी बोगनवेलसह कोणत्याही काटेरी झाडांची लागवड केली जात नसून त्याऐवजी लिलीच्या वृक्षांची लागवड केली जात असल्याचे स्पष्ट केले.इन्फोअवघे चार सदस्य उपस्थितशहर सुधार समितीच्या मागील सभेला अधिकारी उपस्थित नसल्याने सभा गुंडाळावी लागली होती. मंगळवारी झालेल्या सभेला सभापतीसह अवघे चारच सदस्य उपस्थित होते. उर्वरित पाच सदस्यांना वारंवार दूरध्वनी करुनही त्यांनी त्याकडे पाठ फिरविली. विषय समित्यांच्या सभांना प्रशासनही गांभीर्याने घेत नसल्याने सदस्यांनीही समितीला गांभीर्याने न घेण्याचे ठरविल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार