स्थायीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव रवाना
By Admin | Updated: March 16, 2016 23:33 IST2016-03-16T23:30:18+5:302016-03-16T23:33:42+5:30
स्थायीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव रवाना

स्थायीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव रवाना
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यासंबंधीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने बुधवारी विभागीय आयुक्तांकडे रवाना केला असून पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीवरील रिक्त आठ जागांसह राजीनामा दिलेल्या जागांवरही नव्याने सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया राबविल्यानंतर नगरसचिव विभागाने सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रमाकरिता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सभापतिपदासाठी सत्ताधारी मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
मनसेने मात्र कोणत्याही स्थितीत सभापती मनसेचाच होणार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांचेसह माजी खासदार समीर भुजबळ हे ईडीच्या अटकेत असल्याने आणि पक्षातील वातावरण पाहता राष्ट्रवादीकडून सद्यस्थितीत स्थायीच्या बाबत कोणताही विचार सुरू नसल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा संजय साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.