स्थायीवर १२८ कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव
By Admin | Updated: February 17, 2016 23:43 IST2016-02-17T23:42:30+5:302016-02-17T23:43:01+5:30
स्थायीवर १२८ कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव

स्थायीवर १२८ कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव
नाशिक : येत्या शनिवारी होणाऱ्या महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १२८ कोटी रुपयांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले असून आर्थिक परिस्थितीमुळे सदर प्रस्तावांबाबत स्थायीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या महिनाभरापासून स्थायी समितीची बैठक झालेली नाही. स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कालावधी येत्या २८ फेबु्रवारीला संपत असून सभापतींचीही मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे अखेरच्या सभेत प्रशासनाने सुमारे १२८ कोटी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले आहेत. यापूर्वी स्थायी समितीने कोट्यवधी रुपयांच्या भूसंपादनासाठी महापालिका कुठून पैसा उभा करणार, असा सवाल करत प्रस्ताव नाकारले आहेत. त्यामुळे आताही आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना स्थायी या प्रस्तावांबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. शनिवारी होणाऱ्या सभेत महापालिकेच्या गाळ्यांचा लिलाव आणि भाडेवाढीचाही प्रस्ताव असून घंटागाडीला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.