मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

By Admin | Updated: February 27, 2015 22:46 IST2015-02-27T22:46:24+5:302015-02-27T22:46:34+5:30

मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

Proposal for independent squad for Malegaon division | मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

मालेगाव : लाचखोरीच्या वाढत्या घटना पाहता मालेगाव विभागासाठी स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक पथक तयार करण्याचा प्रस्ताव आपण राज्य शासनास सादर केला असल्याची माहिती नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालेगाव उपविभागात अलीकडच्या काळात लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. याव्यतिरिक्त आपल्याकडे लाच मागितली जाते अशा अनेक तक्रारी विभागास प्राप्त होत्या. अशा सर्व तक्रारदारांना वेळेवर सेवा मिळावी, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे व लाचखोरास त्वरित पकडले जावे यासाठी मालेगाव विभागासाठी स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्थापण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक पवार यांनी सांगितले.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदारांसाठी १०६४ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तक्रारदार कोणत्याही दूरध्वनी वा भ्रमणध्वनी सेवेवरून या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार सहजतेने नोंदवू शकतो. तक्रार दाखल झाल्यावर तक्रारदारास त्वरित मदत मिळेल. तसेच सापळ्यासाठी वापरण्यात आलेला पैसाही महिनाभरात तक्रारदारास परत दिला जाईल. या टोल फ्री हेल्पलाइनचा लाभ घेऊन नागरिकांनी लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीला मदत करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक पवार यांनी शेवटी केले आहे.

Web Title: Proposal for independent squad for Malegaon division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.