वाहतूक व्यवस्था सुधारणेचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 24, 2015 23:42 IST2015-11-24T23:41:56+5:302015-11-24T23:42:37+5:30
वाहतूक व्यवस्था सुधारणेचा प्रस्ताव

वाहतूक व्यवस्था सुधारणेचा प्रस्ताव
नाशिक : महापालिकेमार्फत स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावात पॅन सिटी विकसित करण्याचाही प्रस्ताव असून, त्यात प्रामुख्याने खासगी वाहतूक व्यवस्थेचे प्रमाण कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणेचा विचार करण्यात आला आहे. याशिवाय शहरात सायकल संस्कृतीत वाढ करण्यासाठी सायकल शेअरिंग प्रकल्पावरही भर राहणार आहे. महापालिकेमार्फत येत्या ३ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला स्मार्ट सिटी अभियानासंबंधी दुसऱ्या टप्प्याकरिता प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महापालिकेकडून पॅन सिटी प्रस्ताव तयार केला जात असून, त्यामध्ये बस वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, मार्ग सुसूत्रीकरण, सार्वजनिक माहिती प्रणाली, सुलभ बसचे डिझाईन, बसेसची संख्या वाढविणे, जीपीएस प्रणालीचा वापर, बस डेपो व डाटा व्यवस्थापन याशिवाय महापालिका व परिवहन मंडळ यांच्यात एसपीव्ही तयार करणे यांचा समावेश आहे. याशिवाय सायकल शेअरिंग प्रकल्प करून डॉकिंग स्टेशन, सायकल ट्रॅक आणि स्मार्ट कार्ड या पायाभूत सुविधांवरही भर दिला जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करतानाच पार्किंग सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. त्यात वाहनतळाची भाडे प्रणाली ठरविणे, रस्त्यालगतच्या पार्किंगच्या जागा