‘एचएएल’चाच विमानसेवेचा प्रस्ताव

By Admin | Updated: April 18, 2017 01:45 IST2017-04-18T01:45:04+5:302017-04-18T01:45:47+5:30

सुखद : नाशिक-हैदराबाद दरम्यान करणार प्रवासी वाहतूक

Proposal for 'HAL' | ‘एचएएल’चाच विमानसेवेचा प्रस्ताव

‘एचएएल’चाच विमानसेवेचा प्रस्ताव

नाशिक : प्रादेशिक हवाई सेवा (रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस) माध्यमातून येत्या सप्टेंबरपासून नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. तत्पूर्वी एचएएलनेच तयार केलेल्या १९ सीटर विमानांच्या माध्यमातून नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा एचएएलचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती एचएएलचे महाप्रबंधक बी. एच.वी. शेषागिरीराव यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिली.
एचएएलचा मुख्यत्वे विमाने तयार करण्याचा उद्योग असून, विमानसेवा पुरविण्याबाबत कोठेही सुरुवात झालेली नाही. मात्र कानपूर येथील एचएएलमध्ये १९ सीटर दोन चार्टड विमाने तयार केली असून, त्यातून प्रामुख्याने प्रवासी वाहतूक करण्याबाबत एचएएलच्या विपणन विभागाने एचएएलच्या अध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे. नाशिकला विमानतळ तयार असून, विमानसेवा सुरू करण्यासाठी निमा तसेच नाशिकच्या विविध संघटना प्रयत्नशील आहेत. त्यातूनच विमानसेवेबाबत सर्वेक्षण सुरू झाल्याचे शेषागिरीराव यांनी सांगितले. एचएएलची १९ सीटर चार्टड विमाने प्रथमत: भाडे कराराने देण्याचे प्रयोजन आहे. त्यातून पाच ते दहा टक्के जरी संबंधित विमान वाहतूक कंपनीने नफा दिला तरी एचएएलला तो पुरेसा आहे. जर कोणी तयारच झाले नाही, तर मात्र एचएएलनेच विमानसेवा देण्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक - दिल्ली किंवा नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत एचएएलला विचारणा केली.
नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई दरम्यान प्रादेशिक हवाई सेवे(रिजनल कनेक्टिव्हिटी सवर््िहस)च्या माध्यमातून एअर डेक्कनने विमानसेवा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे नाशिकहून दिल्लीला जाण्याची प्रथम पसंती फेसबुक सर्वेक्षणातून पुढे आल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी बी.एच. वी. शेषागिरीराव यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी बी.एच. वी. शेषागिरीराव यांनी नाशिकहून नागपूर तसेच हैदराबादपर्यंत या १९ सीटर विमानाने विमानसेवा देणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तिरुपती बालाजीभक्तांची सोयनाशिकहून दरवर्षी तिरुपती (तिरुमल्ला) बालाजीला जाणाऱ्या नियमित भक्तांची संख्या मोठी असल्याने एचएएलने सुरुवातीला नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करावा, असा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी मांडला. त्यावेळी एचएएलचे महाप्रबंधक बी.एच. वी. शेषागिरीराव यांनी वरिष्ठाशी बोेलून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच एचएएलची ही दोन १९ सीटर विमाने नाशिकला दाखल होणार आहेत.

Web Title: Proposal for 'HAL'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.