शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:19 IST

नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय (चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, एक हजार चौरस मीटर क्षेत्रात चटई क्षेत्र असेल तरच क्लस्टर राबविण्यास परवानगी मिळणार आहे.

ठळक मुद्देशासनाकडे लक्ष: एक हजार चौरस मीटरमध्येच मिळणार परवानगी

नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय(चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, एक हजार चौरस मीटर क्षेत्रात चटई क्षेत्र असेल तरच क्लस्टर राबविण्यास परवानगी मिळणार आहे.गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून गावठाण भागातील जुन्या घरांच्या पुर्नविकासाचा प्रश्न प्रलंबीत आहे . त्यासाठी वेगवेगळ्या योजनामांडण्यात आल्या परंतु त्या प्रत्यक्षात साकारल्या गेल्या नाहीत. दरम्यान, २०१७ मध्ये नाशिक महापालिकेसाठी विकास आराखडा तयार करताना गावठाण भागातील पुर्नविकासाची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार राज्य शासनाने शहर विकास आराखडा मंजुर करताना गावठाण भागासाठी क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्ररीत्या नियमावली निर्गमीत करण्यात येणर होती. मात्र, त्याच दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने महापालिकेला नाशिक शहरात गावठाण क्लस्टर राबविल्यास त्याचामुलभूत सेवा सुविधांवर काय परीणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आघात मुल्यमापन अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते, मात्र वर्षभर हा विषय तेव्हा घोळातच राहीला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यासाठी आर्थिक तरतूद केल्यानंतर निविदा मागवण्यात आल्या. त्यात क्रीसील कंपनीला काम देण्यात आले. परंतु हे काम करताना देखील अनेक अडचणी आल्या.शहरातील पाच भागात ड्रोन सर्वे करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आधी पोलिस आणि नंतर डीजीसीएकडे पाठपुरावा करावा लागला. त्यांच्या अहवालानंतर स्थानिक गावठाणातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे देखील ऐकून घेण्याची तरतूद असल्याने महापालिकेने तयारी केली. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यात व्यत्यय आला होता. मात्र, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर यांनीआॅनलाईन मिटींग घेऊन त्यासंदर्भात अहवाल तयार केला. अखेरीस हा अहवाल आयुक्त कैलास जाधव यांच्या स्वाक्षरीने रवाना झाल्याचे वृत्त आहे. महापालिकेन आघात मुल्यमापन अहवालासह प्रस्ताव पाठविताना गावठाण भागात चार एफएसआय मिळावी अशी शिफारस केली आहे. सध्या गावठाणात दोन एफएसआय आहे. त्यात दोनने वाढ करण्यात आली आहे. तर एक हजार चौरस मीटर क्षेत्र असेल तरच त्याला क्लस्टरचे नियम लागू होणार आहेत.गावठाणात दोन ऐवजी चार एफएसआय देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अर्थात ती पूर्ण होत असली तरी दरम्यानच्या काळात वाहनतळ आणि अन्य नियमावली देखील मंजुर झाल्याने चार एफएसआय पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही अशी एक तक्रार आहे. मात्र, आता नवीन युनीफाईड डीसीपीआर मंजुर होणार असून त्यात काही नियम बदलण्याची शक्यता असल्याने नक्की किती एफएसआयवापरण्यास मिळतो याकडे लक्ष लागून आहे

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी