६४ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव
By Admin | Updated: July 12, 2014 00:28 IST2014-07-11T22:23:56+5:302014-07-12T00:28:41+5:30
६४ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव

६४ गावांचे टँकरसाठी प्रस्ताव
बागलाण : तालुक्यातील पर्जन्यमान पूर्णत: घसरल्याने शेतीसिंंचनासह पिण्याच्या पाण्याची भीषणता जाणवू लागली आहे. तालुक्यात सद्यस्थितीत २८ गावे व १ वाडीला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, पावसाने अजून अवकृपा केल्यास सुमारे ६४ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे मंजुरीसाठी रवाना करण्यात येणार आहे.
बागलाण तालुक्यातील १७१ महसुली गावांपैकी सुमारे १२९ ग्रामपंचायतींमधील शेतीसिंंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक बिकट होत आहे. पावसाने अवकृपा केल्याने
सर्वत्र चिंंतेचे वातावरण आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भीषणता जाणवू लागली आहे.
तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील जलसाठा निरंक झालेला आहे. गतवर्षी जून १३ अखेर तालुक्यात सुमारे १८९.८ इतका पाऊस झालेला होता. तुलनेने जून १४ अखेर अवघा ८.९ मि.मी. इतका पाऊस झालेला आहे. यामुळे प्रशासना-बरोबरच सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची चिंंता वाढली आहे.
तालुक्यात आजमितीस २८ गावे व १ वाडीस २० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात पाच शासकीय, तर १५ खासगी
टँकरचा समावेश आहे, तर तालुक्यातील १४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या असून, सहा विहिरींवरून टँकर भरण्यात येतात, तर आठ विहिरींवरून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकर सुरू असलेल्या २८ गावांमध्ये वरचे टेंभे, इजमाने, खिरमाणी, खालचे टेंभे, कूपखेडा, वायगाव, महड, बहिराणे, पिंंपळदर, डोंगरेज, चिराई, राहुड, रातीर,
रामतीर, चौगाव, तरसाळी, इंदिरानगर, सारदे, श्रीपूरवडे, मोरेनगर,
सुराणे, खमताणे, अजमिर सौंदाणे, पिंंपळकोठे, कातरवेल, नवेगाव, बिलपुरी, आखतवाडे यांचा समावेश आहे तर वघाणेपाडे या वाडीचा समावेश आहे.
विद्यमान परिस्थिती जैसे थे काही दिवस राहिल्यास दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील दऱ्हाणे, पिंंपळदर, मोरेनगर, रातीर, केरोबानगर, कोदमाळ, चापापाडा, मानूर, जायखेडा, गोळवाड, नवी शेमळी, विंंचुरे, जोरण, आव्हाटी, बुंधाटे, ब्राह्मणगाव, साल्हेर, अंबापूर, कंधाणे, कोळीपाडा, अजमिर सौंदाणे, कातरवेल, तळवाडे दिगर, जुने नवे निरपूर, वटार, औंदाणे, मोरकुरे, मुंजवाड, पारनेर, मुळाणे या गावांचा तर भाक्षीअंतर्गत रामनगर, फुलेनगर, शरदनगर, सागर कॉलनी, वनोली अंतर्गत भंडारपाडा, सुराणेअंतर्गत लोणारवाडी मानूरअंतर्गत बिरदावनपाडा, खैराडपाडा, साल्हेर अंतर्गत महारदर, भाटअंबा, मोहळांगी, कोळीपाडा, अमरावती, ठेंगोेडांतर्गत लांगडेबेट यांचा वाड्यांचा समावेश आहे, तर सटाणा शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत प्रशासन विचाराधीन असून, शहरातील जनतेलादेखील पाणीकपातीला सामोरे जाण्याचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)