पदवीधर शिक्षक-मुख्याध्यापकांना पदोन्नती
By Admin | Updated: June 8, 2014 00:18 IST2014-06-07T23:03:42+5:302014-06-08T00:18:45+5:30
येत्या १३ जूनला जिल्ह्णातील सर्व गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची बैठक

पदवीधर शिक्षक-मुख्याध्यापकांना पदोन्नती
Images are croped in two sizes. (100px and 320px Size)
नाशिक : पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आवश्यक असलेली पदे व त्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी येत्या १३ जूनला जिल्ह्णातील सर्व गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्णातील काही शाळांमधील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने त्यांची अन्यत्र पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र काही प्राथमिक शाळांमध्ये १५० विद्यार्थी असले तरीही तेथे मुख्याध्यापकांची नियुक्ती देण्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यामुळे काही शाळांवर मुख्याध्यापकांची नियुक्ती आवश्यक ठरणार असून, त्यासाठी येत्या १३ जूनला सुखदेव बनकर गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांसोेबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.
विशेष म्हणजे ११ जूनलाच पदवीधर शिक्षकांचीही समायोजनासंदर्भात बैठक बोलविण्यात आली असून, पदवीधर शिक्षकांचे समायोजन झाल्यावर त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार काहींना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे कळते.(प्रतिनिधी)