मनपा देणार संशोधनवृत्तीला प्रोत्साहन
By Admin | Updated: September 18, 2016 00:43 IST2016-09-18T00:41:49+5:302016-09-18T00:43:25+5:30
आयुक्त : टाटा कन्सल्टन्सी सेंटरला भेट

मनपा देणार संशोधनवृत्तीला प्रोत्साहन
नाशिक : डिस्ट्रीक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या वतीने टाटा कन्सल्टन्सी सेंटरमध्ये कार्यरत युवा संशोधकांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन दिले जाणार असून, त्यांच्यामार्फत लोकोपयोगी आयटी टूल्स तयार करण्यावर भर राहणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.
इंदिरानगर भागात उभारण्यात आलेल्या टाटा कन्सल्टन्सी सेंटरला महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त अभिषेक कृष्ण, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेत्या सुरेखा भोसले आणि विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. या भेटीनंतर आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, टीसीएस आणि महापालिका यांच्यात एक करारनामा करण्यात येणार आहे. टीसीएसमध्ये जे नवसंशोधक वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न राहील. त्यांच्याकडून सामाजिक क्षेत्राविषयी लोकोपयोगी अशी आयटी टूल्स बनवून घेण्यात येतील.
शिक्षण, कृषी, आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर अॅप्स विकसित केले जातील. (प्रतिनिधी)