पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST2021-05-22T04:14:11+5:302021-05-22T04:14:11+5:30

नाशिक : राज्याच्या गृह विभागाने एकूण २६ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीने सहायक पोलीस अधीक्षक अथवा सहायक पोलीस आयुक्त या पदावर ...

Promotion of Inspector of Police as Assistant Commissioner | पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती

पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती

नाशिक : राज्याच्या गृह विभागाने एकूण २६ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीने सहायक पोलीस अधीक्षक अथवा सहायक पोलीस आयुक्त या पदावर बदली केली आहे. नाशिकमध्ये कार्यरत चार पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मधुकर गावित यांची शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमध्ये कार्यरत असलेले शैलेश जाधव यांची नाशिक परिक्षेत्रात वाचक पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नाशिकच्या गुप्तचर प्रशिक्षण शाळा येथे कार्यरत असलेले वसंत मधुकर मोरे यांची पदोन्नतीने शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली असून, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक विजय जाधव यांची धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस अधीक्षक म्हणून गृह विभागाने बदली केली आहे. दरम्यान, शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या सहायक पोलीस आयुक्त पदावर स्वतंत्र अधिकारी लाभला आहे.

Web Title: Promotion of Inspector of Police as Assistant Commissioner