नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी असलेला अल्प कालावधी पाहता, सर्वच उमेदवारांची धावपळ उडाली आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली होती. तथापि, यंदा उमेदवारी अर्ज दाखल करणे व प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात फक्त तीन आठवड्यांचा कालावधी मिळाल्याने सर्वच उमेदवारांची दमछाक झाली.त्यातही राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा, रोड शोचे आयोजन करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यात सहभागी होणे उमेदवारांना क्रमप्राप्त ठरल्याने उमेदवारांचा बराचसा कालावधी वाया गेला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघाचे राजकीयचित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांची एक प्रचार फेरी पूर्ण झाली, परंतु सर्वच मतदारसंघाचा विस्तार पाहता प्रत्येक ठिकाणच्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्य, नातेवाइकांकडे धुरा सोपविण्यात आली.या नेत्यांच्या होणार सभापहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, राष्टÑवादीचे छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभा झाल्या असून, अखेरच्या टप्प्यात आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. शनिवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता निवडणूक प्रचाराची सांगता होणार असून, तत्पूर्वी अखेरचा टप्प्यात झालेल्या वातावरण निर्मितीचा लाभ उठविण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांसाठी जाहीरसभांचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत.
शेवटच्या तीन दिवसांत उडणार प्रचाराचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:58 IST
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी असलेला अल्प कालावधी पाहता, सर्वच उमेदवारांची धावपळ उडाली आहेत.
शेवटच्या तीन दिवसांत उडणार प्रचाराचा बार
ठळक मुद्देधावपळ : राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा