उपक्रमशील शिक्षकांचा गौरव
By Admin | Updated: September 27, 2016 23:40 IST2016-09-27T23:39:35+5:302016-09-27T23:40:09+5:30
उपक्रम : इनरव्हील क्लबतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान

उपक्रमशील शिक्षकांचा गौरव
मालेगाव : इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
विविध खेडेवस्ती येथे जाऊन शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबविणाऱ्या व तन, मन, धन अर्पून भावी पिढी साक्षर, सुदृढ घडविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव रोटरी आय हॉस्पिटल येथे इनरव्हील क्लब आॅफ मालेगाव यांनी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन केला. त्यात मीनाक्षी महाजन, सुरेंद्र जाधव, सुनील गायकवाड, किरण पाटील, लालसिंग पवार, हेमंत खैरनार, प्रशांत अहिरे, दिलीप बच्छाव, वंदना महाले, अनिल गोविंद आदि शिक्षकांचा समावेश आहे.
इनरव्हील क्लबने दत्तक घेतलेल्या तालुक्यातील टेहरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. डी. मगर, शोभा शेवाळे, संगीता पवार, स्वाती शेवाळे, युसुफ मन्सुरी, कन्हैया गांगुर्डे, नूतन रमेश चौधरी, विजया पुंडलिक निकम, नलिनी कापडणीस आदिंचा गौरव करण्यात आला.
गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिनेश शिरोडे, डिस्ट्रिक लिटरसी चेअरमन डॉ. अलका भावसार, क्लब टिच को-आॅर्डिनेटर माधुरी पाठक, क्लबच्या अध्यक्ष अरुणा पाटील, सचिव मनीषा शाह आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरिशा ठाकरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संगीता परदेशी यांनी करून दिला. रेश्मा सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मालेगाव येथील इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदानप्रसंगी पुरस्कार विजेते शिक्षक व पदाधिकारी.