माजी विद्यार्थ्यांकडून सोमपूर विद्यालयाला प्रोजेक्टर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:11+5:302021-09-13T04:13:11+5:30

नामपूर : मागील महिन्यामध्ये १९८६च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयातील ...

Projector gift to Sompur Vidyalaya from alumni | माजी विद्यार्थ्यांकडून सोमपूर विद्यालयाला प्रोजेक्टर भेट

माजी विद्यार्थ्यांकडून सोमपूर विद्यालयाला प्रोजेक्टर भेट

नामपूर : मागील महिन्यामध्ये १९८६च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चांगल्या कंपनीचा प्रोजेक्टर व सीपीयू विद्यालयाला भेट दिला. त्याचा उद्घाटन कार्यक्रम रविवारी (दि. १२) झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य गिरीश भामरे होते. प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. कापडणीस व शालेय समिती सदस्य जीभाऊ भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदानंद भामरे यांनी स्वतः हस्तकलेतून तयार केलेली बैलजोडीची प्रतिकृतीदेखील विद्यालयाला भेट दिली. यावेळी माजी विद्यार्थी व राज्य सरकारचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ विजेते जयवंत ठाकरे तसेच प्रभाकर भामरे, प्रवीण भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य तुकाराम भामरे, धनंजय भामरे, दीपक भामरे, किशोर भामरे, सविता नहिरे, सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच समाधान मोरे, १९८६च्या बॅचचे विद्यार्थी किशोर भामरे, जयवंत ठाकरे, प्रभाकर भामरे, सदानंद भामरे, पोपट मोरे, संजय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर राजपूत यांनी केले तर फलक लेखन जे. पी. खैरनार यांनी केले.

फोटो- १२ सोमपूर स्कूल

सोमपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक कापडणीस यांच्याकडे माजी विद्यार्थ्यांनी एलसीडी प्रोजेक्टर सुपूर्द केला.

120921\12nsk_10_12092021_13.jpg

फोटो- १२ सोमपूर स्कूल 

Web Title: Projector gift to Sompur Vidyalaya from alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.