शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी प्रकल्प
By Admin | Updated: September 21, 2015 22:30 IST2015-09-21T22:28:57+5:302015-09-21T22:30:16+5:30
चांदवड : आयसीएच्या सभेत अहवालाचे लोकार्पण

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी प्रकल्प
चांदवड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी देश ढवळून निघाला असताना, तब्बल सात वर्षांच्या अभ्यासातून इंडियन चेंबर आॅफ अॅग्रिकल्चर (आयसीए)ने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी तयार केलेल्या प्रकल्प अहवालाचे आयसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लोकार्पण करण्यात आले.
आयसीएची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, योगेश पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आयसीएचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस यांना सादर केला जाणार आहे. यामुळे आत्महत्त्या रोखणे शक्य होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सभेस प्रकाश महाले, विजय जाधव, संजय भांबर, तान्हाजीराव धोंगडे, अशोक कडलग, भीमराव कडलग, बबन पाटील, कृषिभूषण सुरेश डोखळे, भाऊसाहेब भालेराव, प्रदीप कडलग, अरुण पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)