वाघ तंत्रनिकेतनच्या वतीने प्रकल्प सादरीकरण स्पर्धा
By Admin | Updated: February 27, 2017 00:37 IST2017-02-27T00:37:03+5:302017-02-27T00:37:20+5:30
नाशिक : के. के. वाघ तंत्रनिकेतन राष्ट्रस्तरीय तांत्रिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नागपूर येथील संघाने इलेक्ट्रॉनिक विभागात विजेतेपद पटकावले,

वाघ तंत्रनिकेतनच्या वतीने प्रकल्प सादरीकरण स्पर्धा
नाशिक : येथील के. के. वाघ तंत्रनिकेतन राष्ट्रस्तरीय तांत्रिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत नागपूर येथील प्रियदर्शनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संघाने इलेक्ट्रॉनिक विभागात तर संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागात आंध्र प्रदेशातील एएएनएम तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले, तर इलेक्ट्रॉनिक्स विभागात नाशिकमधील संदीप पॉलिटेक्निक व के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी दुसरे स्थान राखले. के. के. वाघ महाविद्यालयात ‘प्रो- उत्सव २०१७’ प्रदर्शनात शुक्रवारपासून सुरू असलेल्या राष्ट्रस्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये देशभरातील इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प सादर केले. यातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात नागपूर येथील प्रियदर्शन तंत्रनिकेतन महाविद्यालयाने पहिला क्रमांक पटकावला, तर उपविजेतेपद के. के. वाघ तंत्रनिकेतन व संदीप पॉलिटेक्निक या महाविद्यालयांना विभागून देण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स विभागात व संगणक या दोन गटांतील ३५ प्रकल्पांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यातून शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी विजेते व उपविजेत्याची निवड केली. स्पर्धेतील विजेत्यांना उद्योजक किरण देशमुख, प्राचार्य प्रकाश कडवे आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौैरविण्यात आले. प्रास्ताविक भाऊसाहेब गवळी यांनी केले. प्रियंका आडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)