शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

प्रकल्प बंदिस्त; पर्यटन उद््ध्वस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:53 IST

कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे.

नाशिक : कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नाशिकच्या आजूबाजूला नेमके पर्यटन घडवायचे तरी कसले? हा यक्षप्रश्न सतावतो. राज्याने निधी पुरविला नाही तर केंद्राकडून मिळालेला चार कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि रिंगणातील प्रत्येक उमेदवाराने पर्यटन आणि पर्यावरणाचा आपापल्या जाहीरनाम्यात उदोउदो केला, मात्र प्रत्यक्षात पर्यटनाला वाव जरी असला तरी त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेत विविध प्रकल्पांना गती दिली जात नसल्याने नागरिकदेखील संभ्रमात पडले आहेत. गंगापूर धरण परिसरात पर्यटकांचा राबता असतो, मात्र तेथील बोट क्लब अद्यापही धूळखात पडलेला असून, कोट्यवधी रुपयांच्या बोटींसह या प्रकल्पावर पाणी फिरले आहे. या इमारतीचा अन्य दुसºया तरी कारणासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी होत आहे.गोदावरी परिचय उद्यानाचे तीन तेरानाशिककरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण दूधस्थळी (सोमेश्वर) धबधबा परिसराच्या सौंदर्यीकरणाची अद्याप कुणालाही गरज वाटलेली नाही. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने येथे साकारलेल्या गोदावरी परिचय उद्यानाची पुरती वाट लागली आहे. हे उद्यान केवळ ओसाड मोकळे भूखंड बनून राहिले आहे. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतील हा प्रकल्पदेखील गोदाकाठी बुडाला, असे म्हणणे वावगे ठरू नये. धबधब्याच्या परिसरात येणाºया पर्यटकांसाठी मनपा अद्याप प्रसाधनगृह व पाणपोईचीदेखील सुविधा उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. देखभाल दुरुस्तीअभावी या उद्यानाची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. गर्दुल्ले, जुगारी, मद्यपींचा अड्डा म्हणून या उद्यानाकडे बघितले जाऊ लागले आहे. त्याचा त्रास धबधब्याच्या परिसरात आनंद घेण्यासाठी येणाºया पर्यटकांनाही कायमस्वरूपी सहन करावा लागत आहे.राज्याकडून निधी नाही‘कलाग्राम’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही सुरुवातीला पुरविला गेला, मात्र त्यानंतर केंद्राने योजना बंद पडल्याचे सांगून उर्वरित निधी पुरविला नाही. परिणामी ‘कलाग्राम’चा प्रकल्प अंतिम टप्प्यात येऊन रखडला. उर्वरित कामासाठी राज्याच्या पर्यटन विभागाक डून जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत क लाग्रामचे ग्रहण सुटणार नाही.राज्य पर्यटन विकास महामंडळाने गोवर्धन शिवारात ‘कलाग्राम’चा प्रकल्प मागील पाच वर्षांपूर्वी हाती घेतला होता. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प साकारला गेला, मात्र अंतिम टप्प्यात निधी अपुरा पडल्याने कलाग्रामला तीन ते चार वर्षांपासून लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याने या प्रकल्पावर अद्याप करण्यात आलेला कोटींचा खर्च पाण्यात गेल्यासारखा आहे. केंद्राचा निधी संपून तीन वर्षे उलटली असून, पर्यटन मंत्रालयाकडून या प्रकल्पाचा ‘कळस’ चढविण्यासाठी निधी अजूनही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, हे दुर्दैवच. हा प्रकल्प अधांतरी असताना गंगापूर धरण परिसरात पर्यटन महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘ग्रेप रिसॉर्ट’ची देखणी वास्तू साकारली, मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प अजूनही कार्यान्वित होऊ शकलेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtourismपर्यटन