शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 02:00 IST

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिक मेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्टÑ मेट्रो रेल ...

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिकमेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्टÑ मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोने सादर केला आहे. व्यवहारता पडताळणीदेखील करण्यात आली असून, आता महापालिका आणि म्हाडाच्या मतप्रदर्शनानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याच्या विकासकामांच्या आढाव्यासाठी बैठक घेतली होती.  त्यावेळी नाशिक महापालिकेची स्वतंत्र बैठक घेताना त्यांनी बससेवेचा आढावा घेतला होता. त्याचवेळी त्यांनी नाशिककरांसाठी मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. नाशिककरांची बससेवा किंवा अन्य बाबीच पूर्ण होत नसतानाच थेट मेट्रोसेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी हे नवे स्वप्न दाखवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र आता त्यानंतर काहीही बैठकाही झाल्या होत्या आणि आता तर १८०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवालच महामेट्रोने सादर केला आहे.केंद्र आणि राज्य शासनाचा महामेट्रो हा संयुक्त उपक्रम असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येदेखील हे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो हा एक प्रभावी उपाय असून ८० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. त्यासाठी दोन ट्रॅकचा २८ किलोमीटर एलीव्हेटेड कोरीडोर असेल. रुळ ऐवजी रबर टायरचा वापर असलेली ही मेट्रो विजेवर चालेल. मेट्रो हा सार्वजनिक वाहतुकीसाठी अलीकडच्या काळात सर्वात प्रभावी आणि माफक खर्चातील साधन आहे. पारंपरिक वाहतूक साधनाच्या तुलनेत हे वेगळे साधन नाशिककरांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.घबाड योगलवकरच विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आता अनेक योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. मेट्रोचा विषय त्यामुळेच लवकर मार्गी लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. शहरात जलवाहिन्यांचे तसेच मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी यापूर्वी महापालिकेने सातशे कोटी रुपयांचे प्रकल्प अहवाल सादर केले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMetroमेट्रो