खूनप्रकरणी मालेगावी नागरिकांकडून निषेध
By Admin | Updated: October 23, 2015 22:13 IST2015-10-23T22:11:10+5:302015-10-23T22:13:16+5:30
खूनप्रकरणी मालेगावी नागरिकांकडून निषेध

खूनप्रकरणी मालेगावी नागरिकांकडून निषेध
मालेगाव : येथील मोहित बाविस्कर या तरुणाचा नाशिक येथे खून झाल्याच्या निषेधार्थ शहरातील संतप्त नागरिकांनी सायंकाळी मोसम पुलावर शोकसभा घेऊन पोलिसांना निवेदन दिले.
नाशिक येथे शिकत असलेल्या मोहित बाविस्करचा खून करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जमावाकडून करण्यात आली.
मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास नागरिकांनी हातात पेटत्या मेणबत्ता घेऊन मोहित बाविस्करला श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे विनोद वाघ, रमेश मोरे यांची भाषणे झाली. त्यांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कडासने यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवू, असे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र भोसले, नरेंद्र सोनवणे, राजेंद्र भामरे, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, भरत देवरे, कैलास तिसगे, मदन गायकवाड, धर्मा भामरे, भरत पाटील, सतीश कलंत्री, संजय चांगरे, सुनील वडगे, नरेंद्र जाधव, राजेंद्र अहिरे, राजन जाधव यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.