धनगर समाजाच्या वतीने निषेध

By Admin | Updated: September 2, 2014 01:14 IST2014-09-01T22:09:35+5:302014-09-02T01:14:05+5:30

धनगर समाजाच्या वतीने निषेध

Prohibition on behalf of Dhangar community | धनगर समाजाच्या वतीने निषेध

धनगर समाजाच्या वतीने निषेध

 

सटाणा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यास शासन विलंब करीत असल्याने काळ्या फिती लावत शासनाचा जाहीर निषेध बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्याजवळ काळ्या फिती लावत शासनाचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी शासनाने धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्टाला होणारा विलंबाबत निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल, असा गर्भित इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी नगरसेवक भारत काटके, अनिल जाधव, योगेश शिरोळे, प्रा. मधुकर नंदाळे, दिनकर पाकळे, अरुण शिरोळे, दीपक नंदाळे, दीपक पाकळे, प्रशांत नंदाळे, भय्या नंदाळे, सतीश नंदाळे, भावसा नंदाळे, सागर नंदाळे, योगेश नंदाळे आदिंसह तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Prohibition on behalf of Dhangar community