कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाचा निषेध
By Admin | Updated: February 27, 2015 22:49 IST2015-02-27T22:49:08+5:302015-02-27T22:49:19+5:30
कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाचा निषेध

कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाचा निषेध
सिन्नर : सिटूच्या वतीने तहसीलदारांना निवेदनसिन्नर : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदलांच्या प्रस्तावाच्या विरोधात व कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सिटूच्या वतीने येथे गुरुवारी निदर्शने करण्यात आली.
सिटूचे हरिभाऊ तांबे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयापुढे निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. केंद्रात पंतप्रधान मोदी व राज्यात मुख्यमंत्री फडणवीस सरकार कामगारांच्या कायद्यात कामगार विरोधी बदल करीत असून, या धोरणाचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशात सक्षम कामगार कायदा असतानादेखील कामगारांवर अन्याय सुरू आहे. त्यात केंद्र व राज्य सरकार कायद्यात मालक-धार्जिणे बदल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या कामगार कायद्यात कोणताही बदल करू नये, अशी मागणी करण्यात आलीे. निवेदनावर हरिभाऊ तांबे, किशोर सूर्यवंशी, राजेंद्र पगार, रवींद्र गिरी, संतोष कुलकर्णी, अमोल जाधव दादा ठोंबरे आदिंसह कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)