येवला : शहरात ठिकठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि. २३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या वतीने गंगा दरवाजा भागात प्रतिमापूजनासह विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी दिली. एन्झोकेम विद्यालयात चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य रामदास कहार यांनी दिली. बोस जयंतीनिमित्ताने चित्र प्रदर्शन यांसह विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. खटपट मंच या सेवाभावी संघटनेच्या वतीने चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे अध्यक्ष मुकेश लचके यांनी सांगितले. नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मुख्याध्यापक झेड. डब्ल्यू. ताडगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून हस्ताक्षर, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध विद्यालयांमध्ये सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
By admin | Updated: January 22, 2016 22:54 IST