प्राध्यापकांचा निसर्गाशी मैत्रीचा संदेश

By Admin | Updated: August 7, 2016 23:29 IST2016-08-07T23:28:37+5:302016-08-07T23:29:09+5:30

प्राध्यापकांचा निसर्गाशी मैत्रीचा संदेश

Professors' message of friendship with nature | प्राध्यापकांचा निसर्गाशी मैत्रीचा संदेश

प्राध्यापकांचा निसर्गाशी मैत्रीचा संदेश

नाशिक : एकलहरे येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वृक्षांना फेंडशिप बँड बांधून जागतिक मैत्री दिन साजरा करीत प्राध्यापकांनी निसर्गाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी मातोश्री शिक्षण संकुलातील कडुनिंबाच्या झाडाला मैत्रीचे बंधन बांधत या उपक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी प्राचार्य संजय बागुल, उपप्राचार्य डॉ. वर्षा पाटील, प्रा. नीलेश घुगे, प्रा. उदय नाईक, प्रा. श्रीधर खुळे, प्रा. जयंत भंगाळे, प्रा. अण्णासाहेब तांबे, प्रा. शैलेंद्र शुक्ला आदि मान्यवर उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष निवडून त्याच्या संवर्धनाची सर्व जबाबदारी स्वीकारत मैत्रीची शपथ घेतली.

Web Title: Professors' message of friendship with nature