प्राध्यापक उतरले रस्त्यावर

By Admin | Updated: July 26, 2016 00:29 IST2016-07-26T00:28:28+5:302016-07-26T00:29:22+5:30

रायडर्सचा उपद्रव : ‘पादचाऱ्यांचा जीव ओलीस, काय करणार पोलीस’

Professor down on the street | प्राध्यापक उतरले रस्त्यावर

प्राध्यापक उतरले रस्त्यावर

 नाशिक : पंधरवड्यापूर्वी कॉलेजरोडवरील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून मार्गस्थ होत असताना कर्मचारी वासुदेव बर्वे यांना अपघात झाला होता. त्यांचा शनिवारी (दि.२३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर धूमस्टाइल बाइक रायडर्सच्या विरोधात सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक सोमवारी (दि.२५) रस्त्यावर उतरले. मानवी साखळी करत प्राध्यापकांनी बर्वे यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली.
एसएमआरके महाविद्यालयातील सहायक ग्रंथपाल वासुदेव बर्वे हे मंगळवारी (दि.१२) रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की बर्वे हे दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. एचपीटी, आरवायके, बीवायके या महाविद्यालयांच्या सर्व प्राध्यापकांनी रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासन व बेदरकार वाहनचालकांच्या निषेधार्थ मानवी साखळी करून आंदोलन केले. यावेळी प्राध्यापकांनी कॉलेजरोडवर सुसाट दुचाकी, पळविणाऱ्या वाहनचालकांचा व त्यांच्याबाबत बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. टवाळांच्या सुसाट दुचाकीमुळे कॉलेजरोड धोकेदायक बनला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Professor down on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.