परधाडीत शिक्षकाच्या श्रीमुखात भडकावली

By Admin | Updated: July 6, 2014 00:17 IST2014-07-05T20:53:50+5:302014-07-06T00:17:18+5:30

परधाडीत शिक्षकाच्या श्रीमुखात भडकावली

Professor Bharadwala of the teacher staged a protest | परधाडीत शिक्षकाच्या श्रीमुखात भडकावली

परधाडीत शिक्षकाच्या श्रीमुखात भडकावली


नांदगाव : तालुक्यातील परधाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक अशोक थोरात यांच्या श्रीमुखात लगावण्याचा प्रकार घडला.
आदल्या दिवशी दम देऊन गेलेला परधाडीचा ग्रामस्थ राहुल पवार याने आज शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाकडे निवासी दाखला व इतर कागदपत्र दाखविण्याची मागणी दमदाटी देत केली. ते कागदपत्र कसे देत नाहीत, असे अवसान आणून पवार याने मागेपुढे न बघता सरळ शिक्षक थोरात यांच्या तोंडात थप्पड मारली. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अरुण जाधव व समितीचे दुसरे सदस्य उपस्थित होते. हा प्रकार थांबविण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही पवार याने धक्काबुक्की करून अर्वाच्य भाषा वापरली. सदर प्रसंगाचे तीव्र पडसाद तालुक्यातील शिक्षकांमध्ये उमटले. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कदम व सचिव काकडे यांनी शिक्षक थोरात यांच्यासह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Professor Bharadwala of the teacher staged a protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.