व्यावसायिकांची दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:32 IST2020-08-06T22:22:30+5:302020-08-07T00:32:08+5:30
चांदवड : चांदवड हद्दीतील व्यावसायिकांसाठी दुकानांची वेळ सध्या सकाळी ९ ते ५ असून, ती वेळ वाढवून संध्याकाळी ७ पर्यंत करावी, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ राऊत, शिवसेना उपप्रमुख संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, राहुल हांडगे, सुनील बागुल यांनी मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्यावसायिकांची दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी
ठळक मुद्देशहरातील आस्थापना सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी,
चांदवड : चांदवड हद्दीतील व्यावसायिकांसाठी दुकानांची वेळ सध्या सकाळी ९ ते ५ असून, ती वेळ वाढवून संध्याकाळी ७ पर्यंत करावी, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ राऊत, शिवसेना उपप्रमुख संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, राहुल हांडगे, सुनील बागुल यांनी मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्टÑ शासनाने सर्व दुकाने, आस्थापना सायंकाळी ७ पर्यंत उघडण्यास परवानगी दिल्याचे वृत्तपत्र व न्यूज चॅनलद्वारे प्रसारित केले. त्यानुसार शहरातील आस्थापना सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, मागणी निवेदनात केली आहे.