शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्सूल तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:01 IST

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमहेंद्र बोरसे : पाथरेत सेंद्रिय व जैविक खते वापरावर कार्यशाळा

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.पाथरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय नाशिक व एस.आर.टी. अ‍ॅग्रो सायन्स कंपनी छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय व जैविक शेती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे समन्वयक शशिकांत पठारे, उपव्यवस्थापक भरत जाधव, सहायक व्यवस्थापक सुनील शेलवले, उपव्यवथापक किशोर राठोड, विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, श्रीकांत बेहरे, कुणाल शित्रे, प्रमोद वझरे, पाथरे सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गंगाधर सुडके, बाळासाहेब घुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, नवनाथ नरोडे, चांगदेव गुंजाळ उपस्थित होते.आंबा, शेवगा, सोयाबीन, वाटणे, भट, ऊस, कापूस, मूग, बाजरी, काकडी, भुईमूग, मका आणि भाजीपाला यासाठी उपयोग होतो. यावेळी शशिकांत पाटील, किशोर पठारे यांनीही शेतकºयांना कॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र चिने, प्रवीण चिने, बाळासाहेब चिने, कारभारी सुडके, नारायण गुंजाळ, भाऊसाहेब नरोडे, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, प्रमोद नरोडे, सूर्यभान गुंजाळ, अशोक गव्हाणे, मोहन दवंगे, संदीप ढवण, भीमा पवार, योगेश रहाणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्सूल हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले असून, त्यातून औषधांची निर्मिती केली आहे. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर ही खते आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात पाथरे सोसायटीत प्रथमच शेतकºयांना याबद्दल माहिती देण्यात आली. याद्वारे शेती केली असता निश्चित फायदा होतो आणि पर्यावरण संरक्षण होते.