शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून उद्घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:04 IST

पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे.

ठळक मुद्देसुरक्षितता कशी बाळगावी याबाबत प्रबोधन

नाशिक : ‘महिलांना सावधानतेचा इशारा...पायी जाताना अनोळखी इसमाने पत्ता विचारल्यास दुर्लक्ष करा, हेल्मेटधारी दुचाकीस्वारांकडून पाठलाग होत असेल तर तत्काळ ‘१००’ क्रमांक फिरवा, संशयितांकडे कानाडोळा करू नका, तो सोनसाखळी चोरही असू शकतो, अशा उद्घोषणा गल्लीबोळात मागील तीन ते चार दिवसांपासून रहिवाशांच्या कानी पडत आहे.पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. या भोंग्यांद्वारे पादचारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. संशयित सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पंचवटी पोलीस हा नवीन प्रयोग राबवितांना दिसून येत आहे.पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून २५-२७ या वयोगटांतील चोरटा पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पोबारा करत आहेत. सोनसाखळी चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांना रोख बक्षिसासह क्राइम ब्रॅन्चमध्ये पोस्टिंग अशी मेगाआॅफरही दिली होती. सोनसाखळी चोरीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी नागरी वसाहत, मोकळा रस्ता, यापूर्वी सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना ज्या परिसरात घडल्या, त्या भागात दिवसभर पंचवटी पोलिसांकडून गस्त घालत सोनसाखळी चोराचे वर्णन देत, रस्त्याने पायी चालत जाणा-या पादचारी महिलांनी आपल्या गळ्यातील दागिने, मंगळसूत्र, मोबाइल, पर्सची सुरक्षितता कशी बाळगावी, याबाबत प्रबोधन करत आहेत. वर्दळीच्या परिसरात नियमितपणे पोलिसांकडून वाहन थांबवून नागरिकांना आवाहन करत विविध सूचनाही दिल्या जात आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीChain Snatchingसोनसाखळी चोरी