परशुराम जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक
By Admin | Updated: April 29, 2017 02:17 IST2017-04-29T02:16:42+5:302017-04-29T02:17:10+5:30
नाशिक : परशुराम जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध संस्थांच्या वतीने भगवान परशुराम यांची मिरवणूक काढण्यात आली

परशुराम जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक
नाशिक : परशुराम जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध संस्थांच्या वतीने भगवान परशुराम यांची मिरवणूक काढण्यात आली तर अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम प्रतिष्ठा, सर्व शाखीय ब्राह्मण, प्रांतीक ब्राह्मण आणि सर्व भाषिक ब्राह्मण यांच्या वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कालिका मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी परशुराम पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी मंदिराजवळून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. रॅली गडकरी चौक, त्र्यंबक नाका, जुने सीबीएस, शरणपूररोड, कॉलेजरोड, जिहान सर्कल, केटीएचएम महाविद्यालय, अशोकस्तंभ मार्ग रॅली कालिका मंदिर येथे नेण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर उपस्थित होते. परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने भद्रकाली देवी मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली. परशुराम प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे भगवान परशुराम यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.