शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:15 IST

जामा गौसिया मशिदीचे मुख्य इमाम मौलाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातून सकाळी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देफातिहा, दरूदोसलामचे सामुहिक पठण करत अन्नदानाला प्रारंभगौसिया फैजान-ए-मदारचे विद्यार्थी पारंपरिक गणवेशात सहभागीमिरवणूकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतेदरूदोसलामचे सामुहिकरित्या पठण करत शिस्तबध्द संचलन

नाशिक : वडाळागाव परिसरात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह बघावयास मिळाला. रविवारी (दि.१०) सकाळपासूनच परिसरात मिरवणूकीची लगबग सुरू झाली. तरूणाईकडून घरे, दुकाने व आपला परिसर सजविण्यात आला होता. त्यामुळे मिरवणूक मार्गासह गल्लीबोळांचे रूप पालटल्याचे दिसून आले. जामा गौसिया मशिदीचे मुख्य इमाम मौलाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातून सकाळी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली.जुने नाशिक, वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि भागात मुस्लीम तरूण मित्र मंडळांसह विविध संघटना, संस्थांकडून आपआपला परिसर आकर्षक पध्दतीने सजविण्यात आला आहे. येथील जामा गौसिया मशिद, सादिकीया मशिद, गरीब नवाज मशिदीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या. रझा चौक परिसरात ख्वाजा के दिवाने (केडी ग्रूप) युवक मंडळाकडून करण्यात आलेल्या आकर्षक सजावटीने सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच संजरी मार्ग कॉर्नरवर हुसेनी फ्रेन्ड सर्कल, मुस्तुफा सोसायटी फेन्ड सर्कल, अमन्स फेन्ड सर्कल, तैबानगर फ्रेन्ड सर्कल, मदिनानगर फे्रन्ड सर्कल, गरीब नवाज कॉलनी फ्रेन्ड सर्कलकडून आकर्षक सजावट करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणूकीत सहभागी धर्मगुरूंचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दहा ते पंधरा मंडळांनी मिरवणूकीत सामील होत पैगंबरांवर अधारीत स्तुतीपर काव्य, दरूदोसलामचे सामुहिकरित्या पठण करत शिस्तबध्द संचलन केले. दारूलउलूम गौसिया फैजान-ए-मदारचे विद्यार्थी पारंपरिक गणवेशात सहभागी झाले होते. मिरवणूकीचे हे प्रमुख आकर्षण ठरले. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त वडाळागाव परिसरासह मिरवणूकीत ठेवण्यात आला होता.जुलूस जामा गौसिया मशिद, खंडेराव महाराज चौक, वडाळा पोलीस चौकी, रजा चौक, मुस्तुफा सोसायटी, गणेशनगर, मोहम्मदीया कॉलनी, सावता माळी कॅनॉल रस्त्याने थेट शंभरफूटी रस्त्यावरून मदीनानगर, तैबानगर मार्गे, गरीब नवाज कॉलनी रस्त्यावरून पुन्हा मुख्य चौकातून चांदशावली बाबा दर्ग्यावर पोहचला. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. यावेळी मौलाना जुनेद आलम यांनी पैगंबरांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विचारमंचावर मौलाना नकीम, मशिदीचे विश्वस्त हाजी दादाभाई, एकबाल पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फातिहा व दरूदोसलामचे सामुहिक पठण करत अन्नदानाला प्रारंभ करण्यात आला.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादProphet Muhammad Paigambarप्रेषित मुहम्मद पैगंबरMuslimमुस्लीम