पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त मिरवणूक

By Admin | Updated: September 8, 2016 01:28 IST2016-09-08T01:28:40+5:302016-09-08T01:28:56+5:30

नाशिकरोड : जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे धार्मिक कार्यक्रम

Procession procession commenced procession | पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त मिरवणूक

पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त मिरवणूक

नाशिकरोड : नाशिकरोड जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त श्री महावीर स्वामी प्रतिमा व अठ्ठाई तप करणाऱ्या दीक्षिता विनय कर्नावट हीची परिसरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली होती.
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरात पर्युषण पर्वानिमित्त गेले आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पर्युषण पर्व समाप्तीनिमित्त बुधवारी सकाळी एका सजविलेल्या रथातून श्री महावीर स्वामींची प्रतिमा व अठ्ठाई तप आठ दिवस उपवास करणाऱ्या दीक्षिता विनय कर्नावट हीची वरघोडा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी फळाचे अनुकंपा दान करण्यात आले. तसेच जैन मंदिरात वीर स्थानक पूजन, देवाची भक्ती भजन आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर जैन भवनमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे संघपती कन्हैयालाल कर्नावट, जैन श्रावक संघाचे संघपती सुभाष घिया, गिरीश शहा, पृथ्वीराज बोरा, विजय संकलेचा, संदीप कर्नावट, प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धोंगडे, दत्ता गायकवाड, सुधाकर जाधव, हेमंत गायकवाड, श्याम खोले, अनिल ढेरिंगे, संतोष मंडलेचा, राजू साबद्रा, राजू बोथरा, मनोज चोपडा, परेश ठक्कर, विनय कर्नावट, अतिष वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Procession procession commenced procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.