त्र्यंबकला शिवजयंती निमित्त मिरवणूक

By Admin | Updated: March 9, 2015 00:29 IST2015-03-09T00:28:38+5:302015-03-09T00:29:15+5:30

त्र्यंबकला शिवजयंती निमित्त मिरवणूक

Procession on the occasion of Shivaji Jayanti in Trimbakk | त्र्यंबकला शिवजयंती निमित्त मिरवणूक

त्र्यंबकला शिवजयंती निमित्त मिरवणूक


त्र्यंबकेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त मिरवणूक व पालखी मिविण्यात आली. शिवप्रेमी मिरवणुकीत सामील झाले होते. तर डॉ. दिलीप जोशी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात घोड्यावर स्वार झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्याने आज पायी मिरवणुक काढण्यात आली. मात्र छत्रपती अश्वारूढ होते. गावातील लक्ष्मीनारायण चौकातून पाचआळी मार्गे मिरवणूक निघाली ती नेहमीच्या रुटने जोगळेकर यांच्या घरासमोरून कुशावर्त तिर्थ, तेथून तेलीगल्ली, पाटील गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी पुतळ्या पर्यंत मिरवणुकीचा मार्ग आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता नगर परिक्रमा करण्यात आली. तर रात्री ६ वाजता शाहीर विजय भोळे यांचा शिवजागरणाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.हा सर्व सोहळा मंडलाचे अध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठनेते बाळासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.मात्र सर्व शिवप्रेमी नागरिक विशेषत: युवक सामील झाले होते. पो. नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ.नि. कैलास अकोले व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तम पोलीस बंदोबस्त राखला होता. तर तहसिल व त्यांचे सहकारी जातीने उपस्थित होते.(वाता

Web Title: Procession on the occasion of Shivaji Jayanti in Trimbakk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.