धूलिवंदनानिमित्त सुकेणे येथे वीरांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:10 IST2018-03-03T00:10:23+5:302018-03-03T00:10:23+5:30
होळीच्या दुसºया दिवशी धूलिवंदनानिमित्त कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे आदी परिसरात वीरांचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मौजे सुकेणे येथे हातात सुपडे आणि झाडू घेऊन नृसिंह अवतारातील नकटकवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मौजे सुकेणेचा ग्रामउत्सव असलेल्या हा सोहळ्याचा मान हांडोरे कुळाकडे आहे.

धूलिवंदनानिमित्त सुकेणे येथे वीरांची मिरवणूक
कसबे सुकेणे : होळीच्या दुसºया दिवशी धूलिवंदनानिमित्त कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे आदी परिसरात वीरांचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मौजे सुकेणे येथे हातात सुपडे आणि झाडू घेऊन नृसिंह अवतारातील नकटकवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मौजे सुकेणेचा ग्रामउत्सव असलेल्या हा सोहळ्याचा मान हांडोरे कुळाकडे आहे. एका हातात केरसुनी व दुसºया हातात सूप घेऊन नृसिंंहची वेशभूषा गावातून मिरवरणूक काढण्यात आली. नकटकवडीने तब्बल तीन तास गावात धूम उडवली. गावातील शेकडो आबालवृद्धांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूक झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या पूर्वजांना स्मरण केले. तळी, आरती करण्यात येऊन, त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. हांडोरेवाड्यातील नृसिंह महाराज मंदिरातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. वसंत हांडोरे व गायत्री हांडोरे यांनी सपत्नीक पूजा केली. यंदा दत्तात्रय हंडोरे यांनी नकटकवडी, मनोज हांडोरे यांनी मुसळ्या, तर बाळासाहेब हांडोरे व सुनील हांडोरे यांनी दोरखंड्याची वेशभूषा केली होती. भास्कर धुमसे यांच्या डफवादनात नकटकवडीने गावातील मानाच्या होळीला प्रदक्षिणा घातल्या.