सिद्धी तपस्वींची शहरातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:41 IST2017-08-28T00:41:32+5:302017-08-28T00:41:57+5:30
जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाचा समारोप झाला असून, या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांची सिद्धी तपश्चर्या करणाºया तपस्वींची व संभवनाथ रथाची शहरातून रविवारी (दि. २७) मिरवणूक काढण्यात आली. समुदायाचे गुरू प.पु. प्रेमभुवन बाणू, प.पु. युगंधर विजय, शत्रुंजय विजय व प.पु. धनंजय विजय आदी उपस्थित होते.

सिद्धी तपस्वींची शहरातून मिरवणूक
नाशिक : जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाचा समारोप झाला असून, या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांची सिद्धी तपश्चर्या करणाºया तपस्वींची व संभवनाथ रथाची शहरातून रविवारी (दि. २७) मिरवणूक काढण्यात आली. समुदायाचे गुरू प.पु. प्रेमभुवन बाणू, प.पु. युगंधर विजय, शत्रुंजय विजय व प.पु. धनंजय विजय आदी उपस्थित होते. पर्युषण पर्व समारोपाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या संभवनाथ रथयात्रेसह ४५ दिवस सिद्धी तपश्चर्या करणाºया ९० तपस्वींची तसेच ८ दिवसांची तपश्चर्या करणाºया ७० तपस्वींची मिरवणूक काढण्यात आली. राका कॉलनीतील जैन मंदिरापासून पारंपरिक वाद्याच्या तालावर मिरवणुकीला सुुरुवात होऊन कॅ नडा कॉर्नर तसेच टिळकवाडी सिग्नल मार्गाने पुन्हा राका कॉलनीतील जैन मंदिर येथे आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी जैन समुदायाच्या अनेक भाविकांनी हातात समाजाचे ध्वज व पताका घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वातावरण भक्तिमय झाले होते.