चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक
By Admin | Updated: April 9, 2016 01:19 IST2016-04-09T01:10:40+5:302016-04-09T01:19:20+5:30
झुलेलाल जयंती : गुढीपाडव्याला सामाजिक एकतेचे दर्शन

चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक
नाशिक : भगवान झुलेलाल यांची जयंती सिंधीबांधवांनी उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने शालिमार चौकापासून गोदाघाट रामकुंडापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढली.
शालिमार चौकात विजय महाराज, सुनील महाराज यांच्या हस्ते पारंपरिकरीत्या पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपाचे सुनील बागूल, उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक उत्तम कांबळे, सविता दलवानी, पंडितराव ससाणे आदिंचे उत्सव समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष किशन अडवाणी, उपाध्यक्ष अशोक पंजाबी यांच्यासह नाणिक बदलानी, गुंदू खुबानी, श्ांकर जयसिंगानी, दिलीप पंजाबी आदि समाजबांधवांनी सहभाग घेतला. दरम्यान, शालिमार चौकातून निघालेली मिरवणूक संत गाडगेबाबा चौैक, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंडावर पोहोचली. (प्रतिनिधी)