येवल्यात पर्युषण महापर्व पूर्णाहुतीनिमित्त मिरवणूक
By Admin | Updated: September 22, 2015 00:15 IST2015-09-22T00:14:40+5:302015-09-22T00:15:50+5:30
येवल्यात पर्युषण महापर्व पूर्णाहुतीनिमित्त मिरवणूक

येवल्यात पर्युषण महापर्व पूर्णाहुतीनिमित्त मिरवणूक
येवला : येवला शहरातील १३१ वर्षे प्राचीन श्री अवंती पार्श्वनाथ जिनालय व सकल जैन संघ आयोजित पर्युषण महापर्व पूर्णाहुतीनिमित्त महातपस्वी पू. पाद मुनिप्रवर श्री मोक्षाराक्षतिविजयजी, येवल्याचे सुपुत्र पू. मुनिराज प्रभूरिक्षतिविजयजी म. तसेच पू. साध्वी श्री ललितरात्नाश्रीजी म. आदिच्या पावन सानिध्यात भव्य प्रभुजी व तपस्वी मिरवणूक २० सप्टेंबर रविवारी सकाळी काढण्यात आली. मिरवणुकीत ४ उंट, ४ घोडे, नाशिक ढोल, २ बँड, मिकी माउस, अष्टमंगलची गाडी, तपस्वीची बग्गी प्रभुजीची चांदीची पालखी बरोबर पेशवाई, प्रसादाची गाडी तरुणाचा सतत चालणारा दांडिया रास, लहान मोठ्या सर्वांना बांधलेले फेटे, गेल्या कित्येक वर्षांत झाली नसेल अशी भव्य मिरवणूक तरुणाच्या सहकार्यांना आणि श्री प्रभू सेवा परिवाराने संपन्न झाली. मिरवणुकीत २२ दिवसाचे तप व ८ दिवसांचे तप करणारे तपस्वी उपस्थित होते. घरोघरी रांगोळ्या, पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी होत होती. यानंतर स्वामी वात्सल्याचा कार्यक्रम तर रात्री महाआरती झाली.(वार्ताहर)