भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सानिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST2017-08-06T23:39:18+5:302017-08-07T00:09:59+5:30
स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सानिमित्त मिरवणूक
येवला : स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीमध्ये वेशभूषा केलेल्या दोन मुली घोड्यावर स्वार होत्या. रथात भगवान जिव्हेश्वराची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत महिलांनी व समाजबांधवांनी भगवा फेटा व टोपी परिधान केली होती.
जय जिव्हेश्वर व हर-हर जिव्हेश्वर अशी मुद्रा असलेली टोपी समाजबांधवांनी परिधान केली होती. मिरवणुकीमध्ये साळी समाजातील आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी टिपरीनृत्यासह विविध कला सादर केल्या. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी भावसार समाज अध्यक्ष सुनील भावसार, कोष्टी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत, जय बजरंग फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष मंगेश माळोकर, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, जिव्हेश्वर पतसंस्थेच्या चेअरमन चेतन कोळस, व्हा. चेअरमन कुंदन झोंड यांनी पालखीचे पूजन करून स्वकुळ साळी समाजाध्यक्ष दत्तात्रय मुंगीकर व उपाध्यक्ष सुभाष साळवे यांचा सत्कार केला. भगवान जिव्हेश्वरांच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मयूर रोडे व बिद्रविशाल भंडारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन कैलास येलगट यांनी केले. पौरोहित्य प्रदीप धुमाळ व संदीप धुमाळ यांनी केले. भाऊ भागवत, तुलशीदास अनभुले, घुमरे यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व समाजबांधवांना जिव्हेश्वर पतसंस्थेच्या वतीने दुधवाटप करण्यात आले.