पवनपुत्र हनुमानच्या जयघोषात मिरवणूक

By Admin | Updated: April 24, 2016 10:39 IST2016-04-22T23:49:54+5:302016-04-24T10:39:00+5:30

पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रम तर्फे हनुमान जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

The procession in the auspices of PawanPut Hanuman | पवनपुत्र हनुमानच्या जयघोषात मिरवणूक

पवनपुत्र हनुमानच्या जयघोषात मिरवणूक

नाशिक : पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रम यांच्यातर्फे हनुमान जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, सजविलेल्या वाहनावर हनुमानाची गदाधारी मूर्ती, ताल वाद्ये, वाजंत्री, ढोल-ताशे आणि डीजेवर सुरू असलेली भक्तिगीतांनी मंगलमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रमातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे यंदाचे दुसरे वर्ष होते.
वाकडी बारव येथून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीचे श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधिश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वती महाराज पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या लोकनृत्यांनीही विशेष दाद मिळवली. ही शोभायात्रा पुढे दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डमार्गे या शोभायात्रेची रामकुंडावर सांगता करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गात अनेक सुवासिनींकडून मारुतीच्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. या शोभेयात्रेत १२५ किलोग्रॅम वजनाचा मोदक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता तसेच शोभायात्रे दरम्यान साहसी खेळांचेही प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. या शोभायात्रेत आमदार देवयानी फरांदे, सुनील बागूल, जगन पाटील, लक्ष्मण सावजी यांनी सहभागी होत उपस्थितांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The procession in the auspices of PawanPut Hanuman