वृक्षप्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्तीसाठी तिसऱ्यांदा प्रक्रिया

By Admin | Updated: May 9, 2016 00:24 IST2016-05-08T23:21:50+5:302016-05-09T00:24:00+5:30

महापालिका : पात्रतेच्या निकषांमुळे अनुत्सुक

Process for the third time for the appointment of members on the Tree Committee | वृक्षप्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्तीसाठी तिसऱ्यांदा प्रक्रिया

वृक्षप्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्तीसाठी तिसऱ्यांदा प्रक्रिया

 नाशिक : महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर सात अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून पात्रतेच्या निकषांमुळे अनेकजण अनुत्सुक असल्याने तिसऱ्यांदा प्रक्रिया राबवावी लागत आहे. येत्या ६ जूनपर्यंत महापालिकेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.
महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर आयुक्तांसह १६ सदस्य असतात. त्यातील ८ सदस्य हे नगरसेवकांमधून नियुक्त केले जातात, तर उर्वरित ७ सदस्य बाहेरीलतज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींमधून नियुक्त होतात. महापालिकेने यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत सर्वप्रथम नियुक्तीप्रक्रिया राबविली, परंतु महापौरांना अशा नियुक्त्या करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत प्रक्रियेला हरकत घेण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी आपल्या स्तरावर सदस्यांच्या नियुक्त्या केल्या, परंतु सदर सदस्य अर्हतेसंबंधीची कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे आता तिसऱ्यांदा नियुक्ती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुकांकडून येत्या ६ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. वृक्षप्राधिकरणवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी सदर व्यक्तीस वृक्षांचे रोपण आणि जतन या क्षेत्रातले विशेष ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असला पाहिजे. तसेच सदर व्यक्ती ही बिनसरकारी संघटनेची प्रतिनिधी असली पाहिजे. बिनसरकारी / अशासकीय संस्था ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत असावी, आत्रण सदर व्यक्तीस वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन व संरक्षण यामध्ये रुची असावी आणि त्या क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा समृद्ध अनुभव प्राप्त असावा, असे निकष देण्यात आले आहेत. या सर्व अटी-शर्तींची परिपूर्ती करणाऱ्या व्यक्तींचाचा सदस्य नियुक्तीसाठी विचार केला जाणार आहे. याच अटी-शर्र्तीमुळे अनेकांना इच्छा असूनही प्राधिकरणावर सदस्य म्हणून जाता आलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Process for the third time for the appointment of members on the Tree Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.