नाशिक : मिरवणुकीत नाचण्यावरून वाद होऊन एकास तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे़ सिडकोतील महाराणा प्रताप चौकात राहणारा शुभम जयेश शर्मा (१५) हा मित्र कल्पेशसोबत साईबाबा मिरवणुकीत नाचत होता़ त्यांचा भावड्या, लाल्या, हर्षल या तिघांशी नाचण्यावरून वाद झाला़ या तिघांनी शुभम आणि कल्पेश या दोघांना मारहाण केली. यामध्ये शुभमच्या नाकाचे हाड मोडले़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
मिरवणुकीत नाचण्यावरून मारहाण
By admin | Updated: May 7, 2014 22:16 IST